दिग्रस (जि. यवतमाळ) : शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून स्थानिक प्रशासनाने दिग्रस शहर व परिसरात 22 ते 28 जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली जात आहे. नागरिकांनी प्रशासनासह आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून बाहेर न पडता घरात सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार राजेश वजिरे यांनी केले. लॉकडाऊनदरम्यान दिग्रस शहरात असे चित्र होते.

(व्हीडीओ : रामदास पद्मावार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.